भारतीय संस्कृती मध्ये संतांना ज्ञान, त्याग व भक्तीचे प्रतीक मानले जाते. मनुष्याला स्वार्थ, तृष्णा, अहंकार शिकवावे लागत नाही, हे सर्व विकार त्याच्या मध्ये नैसर्गिक रित्या असते परंतु निस्वार्थ, विरक्ती व सहजभाव हे व्यक्ती मध्ये संस्कारातून तयार होतात हे संस्कार संतांच्या विचारतून येतात.
ज्ञान फार कमी लोकांना स्वत:कडे आकृष्ट करते, ज्ञान घेण्याची जिज्ञासा कमी लोकांमध्ये असते ती जिज्ञासा संतांच्या विचारतून तयार करता येते. मनुष्यासाठी असलेली सर्वात कठिन गोष्ट म्हणजे त्याग होय. त्याग ही एक विस्तृत संकल्पना आहे. अनेकदा व्यक्तीला व्यक्तिचा इच्छा नसताना त्याग करावा लागतो, घराचा, वस्तूंचा, इच्छेचा या व अशा अनेक गोष्टिंचा त्याग करुन व्यक्ती विरक्तिकडे मार्गक्रमण करतो व त्यातूनच भक्तिचा मार्ग मोकळा होतो. याला आत्मिक चिंतन, आत्मिक प्रवास म्हणू शकतो या मार्गा मध्ये व्यक्ती स्व सुखा पेक्षा पर सुखाला स्व अनुभूती मधुन पर अनुभुतिला जाणण्याचा प्रयत्न करतो. अर्थात तो संतात्वाकडे मार्गक्रमण करतो.
या संतत्वाला साध्य करण्याकरिता निर्गुण निराकार ईश्वराच्या शक्तीची व त्याच्या प्रेरणेची गरज असते. त्याच्या स्विकार्यतेची गरज असते जी स्विकर्यता सद्गुणाकडे व सद्कर्माकडे प्रेरित करते. ज्यातून समाज प्रबोधनाच्या व समाजरिवर्तनाच्या संतांच्या भक्ती मार्गाची सुरुवात होते.
महाराष्ट्रातील संत परंपरेने सामाजिक रचनेमध्ये व विचारामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणलेत .
संतांच्या विचारामुळे लोकांचा आत्मिक विकास शक्य झाला, कारण समाजातील कुप्रथा, वाईट विचार कमी किंवा नष्ट होण्यासाठी लोकांचा आत्मिक विकास होणे आवश्यक आहे. आणि आत्मिक विकास साधण्याकरिता समाजात वाईट चालिरिती आणि प्रथा, परंपरा नसायला पाहिजे, या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे.
भारतीय समाजात जात आधारित भेदभाव, धार्मिक आधारावर भेदभाव, वर्ग व जेंडर आधारित भेदभाव आहे.जाती आधारित भेदभाव असल्यामुळे विवाहासाठी जोडीदार नीवडताना अनेक बंधन व मर्यादा येतात ज्यामुळे योग्य जोडीदार मिळने कठिन होतात आणि जाति, धर्म निहाय जोडीदार नीवडीमुले वर्णव्यवस्था जड़ होते व त्याचे पोषण होते यावर उत्तर म्हणून महात्मा बस्वेश्वरांनी आंतर जातीय विवाहाचे समर्थन केले व स्वतः सर्वांच्या सहमतीने एका ब्राह्मण कलावती नावाच्या मुलिचा विवाह शीलवन्त नावाच्या चांभार मुलाशी लावून दिला.
धर्माच्या नावावर जे तिर्थाटन केली जातात त्यात काही साध्य होत नाही त्यावर महात्मा बस्वेश्वर म्हणतात
"पाणी पाहिलं की डुबकी मारतात, झाड पाहिल की फेर्या घालतात
वाहून जाणारं पाणी, वठुन जाणारं झाड
भुरळ घालणार्यांना आपली जाण कशी असेल"
आत्मिक विकास जर साधायचा असेल तर भौतिक आणि तात्पुरत्या गोष्टी करुन चालणार नाही. आत्मिक प्रवास हा आन्तरीक प्रवास आहे. जो परम शांति पर्यंतचा प्रवास साध्य करतो. ईश्वराच्या अस्तित्वाची स्विकार्यता असोत किंवा नसोत मात्र आपल्या आत्मा, मन, किंवा चित्ताची स्विकार्यता असावी जी स्विकार्यता मनुष्य जीवनाचे मार्गक्रमण करते व जे मनुष्य जन्माचे सार्थक करते.
संत/भल्या लोकांची संगती व्यक्ती मधील सत गुण बाहेर काढतात, त्याचा विकास करतात.
यावर महात्मा बस्वेश्वर म्हणतात
"अज्ञ जनांचा संग केल्यावरी
दगडांच्या आघाताने ठिणग्या काढल्यापरी
सूज्ञ जनांचा संग केल्यावरी
दही मंथुन लोणी काढल्यापरी
चेन्नम ल्लिकार्जुनराया
तव शरणाचा संग केल्यावरी"
जीवन चांगले समृद्ध करायचे असेल तर चित्त शुद्ध करने गरजेचे आहे, चित्त शुद्धीचे महत्व सांगताना
संत तुकाराम म्हणतात
"आता तरी पुढे हाची उपदेश नका करु नाश आयुष्याचों
सकाळच्या पाया माजे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करों"
Comments
Post a Comment